Wednesday, March 9, 2011

नदी

एक नदी आटली म्हणून
थांबत नाही भरती
सागर कधी जगत नसतो
अनुदाना वरती!

समुद्राच सारच वेगळ
वेगळ आणि ख़ास
पाउस असो पाउस नसों
लाटा चोवीस तास!

- ज्ञानेश वाकुडकर
( 'नदी' या खंड काव्या मधून )


Wednesday, February 9, 2011

कशी उनाड झाली हवा - ग़ज़ल

कशी उनाड झाली हवा
हे हळु हळू अनुभवा!

किती जन्म जाळले तरी
हा कसा ऊपाशी तवा? 

ती नको म्हणाली तरी     
का मनात उडतो थवा?

स्वप्नात ओठ टेकले
मिडियात कसा गवगवा?

मी फ़िरुन येइन पुन्हा
अन असाच राहीन नवा!


-Dnyanesh वाकुडकर